शिरसोली येथील प्राजक्ता बारी हिच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करा

जळगाव, प्रतिनिधी |  तालुक्यातील शिरसोली येथील विवाहिता प्राजक्ता अजय बारी हिला सासरच्या मंडळींनी ठार मारून गळफास दिल्याचा आरोप माहेरवाशीयांसह शिरसोली येथील बारी समाज बांधवांने केला आहे. या घटनेची कसून चौकशी करून दोषींना कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणीचे निवेदन सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांना निवेदन देण्यात आले.

 

नातेवाईकांच्या माहितीनुसार, प्राजक्ता उर्फ कोमल अजय बारी (वय-२२) रा. शिरसोली प्र.न. ता.जि.जळगाव या पती अजय अशोक बारी यांच्यासह राहत होत्या. प्राजक्‍ता बारी हिला माहेरहून २ लाख रूपये आणावे यासाठी पतीसह सासू, सासरे, जेठ आणि जेठाणी यांनी गेल्या वर्षभरापासून सतत छळ केला. हा त्रास सहन न झाल्याने विवाहित प्राजक्ता हिने राहत्या घरातील वरच्या मजल्यावर साडीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे बुधवारी १९ जानेवारी रोजी उघडकीला आले होते. परंतू प्राजक्ताने आत्महत्या केलेली नसून तीचा दोन लाखांसाठी खून करण्यात आला आहे. असा आरोप विवाहितेचा मावसभाऊ प्रल्हाद सुकलाल फुसे रा. शेंदुर्णी ता.जामनेर यांनी केला आहे. त्यामुळे तिला ठार मारून गळफास घेतल्याचा बनाव केला आहे. या घटनेची चौकशी करून तिला ठार मारणारे पतीसह तिच्या सासरकडील मंडळींना कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणीचे निवेदन शुक्रवार २८ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता देण्यात आले. याप्रसंगी बारी समाजाचे पंच अध्यक्ष सुभाष अस्वार, खान्देश महिला मंडळाच्या अध्यक्ष मंगला बारी, बंडू काळे, पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी, संतोष आंबटकर, श्रावण ताडे, विजय काटोले, ज्ञानेश्वर कुलबाडे, राजू ताडे, सुनिल अडवाल, रघुनाथ सुळे, भगवान बुंधे, जयंत खडसे, जितेंद्र खडसे, प्रकाश रोकडे, भावत मराठे, योगेश ताडे, राजू आस्वार यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Protected Content