Home क्राईम प्रेमसंबंध असलेल्या तरुणीशी लग्न करण्यासाठी तरुणास बेदम मारहाण

प्रेमसंबंध असलेल्या तरुणीशी लग्न करण्यासाठी तरुणास बेदम मारहाण


Fighting

भुसावळ (प्रतिनिधी) प्रेमसंबंध असलेल्या मुलीशी लग्न केले नाही म्हणून तिने घरी बोलावून चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला, तसेच तिच्या नातलगांनी बेदम मारहाण केली, अशी तक्रार जळगाव येथील रहिवासी असलेल्या एका तरुणाने येथील बाजारपेठ पोलीस ठाण्यात दिली आहे.

 

अधिक माहिती अशी की, सदर तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार तो जळगाव येथील इकरा महाविद्यालयात पहिल्या वर्षाला शिक्षण घेतो. सुभाष चौकात शिकवणी घेणाऱ्या एका शिक्षकाकडे भुसावळची १० वीत शिकणारी एक तरुणी येत होती. तिच्याशी त्याची ओळख होवून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. दोघे मोबाईलवरून एकमेकांच्या संपर्कात होते. दरम्यान त्याचे गेल्या जानेवारी महिन्यात दुसऱ्या एका मुलीशी लग्न ठरले. तेव्हापासून ही भूसावळची मुलगी मला सतत मोबाईलवर धमकी देत होती, मात्र मी दुर्लक्ष केले.

२१ एप्रिल रोजी तिने मला कॉल करून तिच्या घरी ताबडतोब भेटायला बोलावले आणि जर गेलो नाही तर जीवाचे बरे-वाईट करण्याची पोलीसात तक्रार करण्याची धमकी दिली. त्यामुळे मी माझ्या मोटार सायकलने भुसावळ शहरात खड्का रोडवर नविन ईदगाह समोरील मुस्लिम कॉलनीतील तिच्या घरी गेलो असता ती गेटमध्येच उभी होती, मी आत जाताच तिने तिचे वडील आसीफ शाह उर्फ कालू खुर्रम अयुब शाह
, समिर शाह अयुब शाह, राज शाह अयुब शाह, आसिफ शाह यांचा भाचा शोयब, आसिफ शाह यांच्या पत्नी (नांव माहीत नाही) यांनी मला लोखंडी रॉडने व चापट्टा बुक्यांनी बेदममारहाण करून माझा डावा पाय डाव्या हाताचे बोट फॅक्टर केले.

मला मारहाण केल्यानंतर आसिफ शाह याने पोलीसांना आमच्या घरात चोर घुसला आहे, अशी खोटी माहीती दिल्याने काही वेळात त्या ठिकाणी पोलीस गाडी आली. पोलीसांनी मला पोलीस गाडीतटाकून बाजारपेठ पोलीस ठाण्यात नेले, नंतर औषध उपचाराकरीता जळगाव येथील सिव्हील हॉस्पीटलला दाखल केले होते. त्यानंतर दि.२२ रोजी दुपारी १२ च्या सुमारास माझ्या वडीलांनी सिव्हील हॉस्पिटल येथुन काढून मला ‘साईपुष्प हॉस्पीटल’ येथे अँडमिट केले असून तेथेच माझ्यावर
औषधोउपचार सुरु आहेत. या तक्रारीवरून बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पुढील तपास पोलीस नाईक नरेंद्र चौधरी करीत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound