एरंडोल प्रतिनिधी । एरंडोल येथील नगरपालिकेचे प्रशासक विकास नवाळे यांच्या संकल्पनेतुन राबविण्यात येत असलेल्या अंजनी नदी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी विविध संघटनांनी या मोहिमेत सहभाग नोंदविला आहे.
अंजनी नदी स्वच्छता मोहीमेत सोमवारी बजरंग दल, शिवप्रतीष्ठान, भा.ज.पा. शाखा(शहर), विवेकानंद केंद्र, योगेश्वर पतसंस्था या संस्था व संघटनांच्या युवा कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवुन ३ ट्रॉली प्लास्टीक कचरा जमा केला.
या प्रसंगी माजी नगरसेवक नरेंद्र पाटील, बजरंग दलाचे भरत महाजन, भाजपा तालुका सरचिटणीस अमोल देशमुख, माजी उपनगराध्यक्ष अशोक चौधरी, विश्व हिंदु परीषदेचे भूषण चौधरी, प्रा.गणेश महाजन(विवेकानंद केंद्र), सुनील चौधरी (युवा भाजपा), प्रकाश पाटील, गणेश पाटील, शिवप्रतीष्ठान(हिन्दुस्थान), सागर मराठे, विकी ढाकणे, राहूल राजपूत, यशवंत वाघ, शुभम मोराणकर,लोकेश नहाले, हेमंत सोनार यांनी सक्रीय योगदान दिले.