यावल प्रतिनिधी । तालुक्यातील कोळवद गावातील नागरिकांनी आज दि. २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त डॉ. कुंदन फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक असलेल्या ई-श्रम कार्डची मोफत नोंदणीचा दुसऱ्या सत्र अभियानाला सुरुवात करण्यात आली.
हे अभियान एक दिवस सातोद व एक दिवस कोळवद असे दोन दिवस झाले. सदरचे कार्यक्रम कोळवद गावातील श्री विठ्ठल मंदिर व हनुमान मंदिर सातोद तालुका यावल येथे निशुल्क ई श्रम कार्ड नोंदणी महाअभियानास दुसऱ्या टप्यात सुरुवात करण्यात आली. सदर अभियानास कोळवद व सातोद गावातील नागरिकांचा उदंड असा प्रतिसाद मिळाला. दि.२५व २६ जानेवारी या दोन दिवसामध्ये एकूण ९७८ लाभार्थ्यांनी या ई -श्रम कार्ड नोंदणीत आपले नांव नोंदणी करून अभियानाचा लाभ घेतला. आज कोळवद येथे संपन्न झालेल्या या नोंदणी अभियानाचे उद्घाटन यावल येथील युवा सामाजीक कार्यकर्ते डॉ. कुंदन फेगडे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी हेमंत पाटील, परेश फेगडे, सागर महाजन, तुषार फेगडे, पराग फेगडे, तुषार चौधरी, देवेन फेगडे, सुभाष फेगडे, किशोर चव्हाण, हर्षल सोनवणे, मिलिंद शिरसाद आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
सदरील अभियानास यशस्वी करण्यासाठी धिरज भोळे, सागर लोहार, विशाल बारी, हर्षवर्धन मोरे, तीर्थराज भिरूड, जयवंत माळी, चेतन कापुरे,अक्षय राजपूत, शुभम सोनवणे यांचे योग्य मार्गदर्शन व सहकार्य लाभले.