रावेर व पालचे तापमान एप्रिल मध्येच 46 अंशाच्या पार (व्हीडीओ)

HEATTHERMOMETER

 

रावेर (प्रतिनिधी) तालुक्यात उष्णतेच्या लाटेचा चांगला फटका बसत आहे. मुले,नागरीक, महिला सर्वांची लाही-लाही होत आहे असून आरोग्याची काळजी घेण्याचे अवाहन डॉ संदीप पाटील यांनी केले आहे. गेल्या आठ दिवसापासून उष्णतेचे प्रमाण दररोज वाढत जात आहे. आज पाल येथील तापमान 44 तर रावेर येथे 46 अंश सेल्सियसवर तापमान पोहोचलेय त्यामुळे उकाड्यात प्रचंड प्रमाणात वाढला झालीय.

 

 

एकेकाळी पाल हे थंड हवेचे ठिकाण म्हणून गणले जात होते. उन्हाळ्यामध्ये तेथे पर्यटकही येत होते. मात्र कालांतराने पावसाळा कमी होत चालला. त्यामुळे उष्णतेचे प्रमाण वाढत जाऊन आज तापमानाचा उच्चांक पाल येथे 44 .30 अंश सेल्सिअस पर्यंत जाऊन पोहोचला आहे. गेल्यावर्षी 23 एप्रिल रोजी 42 24 एप्रिलला 43 आणि 25 एप्रिल 2018 ला आज रोजी पालचे तापमान 43 अंश सेल्सिअस होते. ते या वेळेस एक अंश सेल्सिअस तापमान वाढलेले दिसले. तसेच पाल येथे कधीही न वाढलेले उच्चांकी तापमान हे 28 मे 2018 47 अंश सेल्सिअस नोंदले गेले. गेल्या वर्षी पावसाळा कमी झाल्यामुळे पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहेत. जंगलामध्ये पाणी मिळत नसल्याने जंगली प्राणी आणि पक्षी यांना अन्नासाठी आणि पाण्यासाठी लोकवस्तीकडे धाव घेत असल्याचे समोर येत आहेत. त्यामुळे गाव वस्तीकडेल असलेले पशुधन यांच्यावर हिंस्र प्राण्यांच्या हल्ली सुद्धा यावर्षी वाढलेले आहे.

 

 

प्राण्यांना आणि पक्षांना पाण्यासाठी फक्त तलाव आणि धरणाच्या पाण्याचा धरणाच्या पाण्याचा धरणाच्या पाण्याचा आसरा घ्यावा लागत असल्याचे चित्र आहे. अजून मे महिना घ्यावयाचा आहे. त्यामुळे तापमान दिवसेंदिवस वाढत जाऊन याहीपेक्षा पाण्याची परिस्थिती गंभीर होण्याचा धोका आहे. त्यासाठी नागरिकांनी आपल्या पशु धनाची काळजी घ्यावी. त्यांना सावलीमध्ये झाडाखाली किंवा गवताची घरे बनून ठेवावी. तसेच पक्षांसाठी ठिकठिकाणी घरांच्या गच्चीवर सावलीत धान्य आणी पाण्याची व्यावस्था करावी. तसेच नागरीकांनी सुद्धा उन्हापासून बचाव होण्यासाठी सकाळी ११ वाजेच्या आत बाहेरील कामे उरकून घ्यावेत किंवा उन्हापासून बचाव होण्यासाठी डोळ्यांना चश्मा आणी टोपी रुमाल वापरून पिण्याचे पाणी सोबत ठेवून उन्हापासून स्वतहाचे संरक्षण करावे,असा सल्ला डॉ.योगिता पाटील यांनी दिला आहे.

 

 

Add Comment

Protected Content