Home क्राईम महाराष्ट्रासह ८ राज्यांत दहशतवादी हल्ल्याचा धोका

महाराष्ट्रासह ८ राज्यांत दहशतवादी हल्ल्याचा धोका


terror
 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) श्रीलंकेत इस्टर संडेला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या किनारी राज्यांमध्ये समुद्रमार्गे दहशतवादी या राज्यांमध्ये प्रवेश करण्याची इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्रासह ८ राज्यांना पत्र लिहून दहशतवादी हल्ल्याच्या संभाव्य धोक्याची माहिती देत अलर्टराहायला सांगितले आहे.

 

 

कर्नाटक पोलिसांच्या माहितीनुसार, त्यांना एका व्यक्तीने फोनवरुन या संदर्भात माहिती दिली आहे. त्यानुसार महाराष्ट्र, कर्नाटकसह इतर ६ राज्यांमध्ये हल्ला घडवून आणण्याचा कट रचला जात आहे. या माहितीनंतर कर्नाटकच्या पोलिसांनी महाराष्ट्र, तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, पुदुच्चेरी, गोवा या राज्यांच्या पोलीस प्रमुखांना पत्र लिहून अलर्ट राहण्यास सांगितले आहे. कारण देशातील आठ राज्यांमध्ये दहशतवादी स्फोट घडवून आणण्याच्या तयारीत असल्याचो माहिती देखील मिळाली आहे. यावेळी दहशतवादी रेल्वे गाड्यांमध्ये स्फोट घडवून आणू शकतात असेही त्याने म्हटले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound