कोरोना ! जिल्ह्यात आज ३३८ रूग्णांची नव्याने भर; २२१ रूग्ण झाले बरे !

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात ३३८ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर २२१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. यात जळगाव शहरासह भुसावळ, चोपडा आणि चाळीसगाव तालुक्यात रूग्ण संख्या अधिक प्रमाणावर आढळून आल्याचे दिसून येत आहे.

 

तालुकानिहाय आकडेवारी

जळगाव शहर-११९, जळगाव ग्रामीण-१६, भुसावळ-८७, अमळनेर-२०, चोपडा-२६, पाचोरा-२, भडगाव -५, धरणगाव-१३, यावल-६, एरंडोल-०, जामनेर-८, रावेर-३, पारोळा-०, चाळीसगाव-२५, मुक्ताईनगर-५, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील ३ असे एकुण ३३८ रूग्ण आढळून आले आहेत.

 

विशेष म्हणजे आज जिल्ह्यातून २२१ बाधित रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात सध्या ३ हजार २४४ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ४७ हजार ८८५ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी १ लाख ४२ हजार ५९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आजवर एकुण २ हजार ५८२ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. असे आहवालानुसार कळविण्यात आले आहे.

Protected Content