Home आरोग्य अरे बापरे…. चाळीसगावात कोरोनाचा कहर; आज ५१ बाधीत रूग्ण आढळले!

अरे बापरे…. चाळीसगावात कोरोनाचा कहर; आज ५१ बाधीत रूग्ण आढळले!

0
39


चाळीसगाव, प्रतिनिधी | शहरासह तालुक्यात कोरोना बाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र आज अचानक चाळीसगावात तब्बल ५१ बाधीत रूग्ण आढळून आल्याने नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

चाळीसगाव शहरासह तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधीत रूग्णांची संख्या चढ उतार सुरू आहेत. मात्र आज जिल्हा प्रशासनाने पाठवलेल्या अहवालानुसार अचानक तब्बल ५१ बाधीत रूग्ण आढळून आल्याने नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. यामुळे धोका वाढला असून नागरिकांची बेफीकीर यास कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. शहरांत विना मास्क संचार करणाऱ्यांची संख्या मोठ्या संख्येने आहेत. यामुळेच रूग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे हि संख्या घसरणीवर आणण्यासाठी प्रशासन अशा प्रकारे पाहूल उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound