जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील एका गावातील तरुणीचे लग्न मोडण्यासाठी तरुणीच्या मित्रासोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर टाकून तिची बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असे की, जिल्ह्यातील एका गावात १९ तरुणी वास्तव्यास आहे. ती शिक्षण घेत असून तिचे लग्न जुळले आहे. तरुणीचे लग्न तुटावे या कारणाने इन्टाग्रामवर विशूनेमाने हे खाते असलेल्या व्यक्तीने तरुणीचे तिच्या मित्रासोबत फोटो इन्स्टाग्रामवरुन टाकले. तसेच तरुणीचे लग्न जुळलेल्या तिच्या भावी पतीलाही संबंधित फोटो पाठवून तिची बदनामी केली, अशी तक्रार तरुणीने जळगाव सायबर पोलिसात दिली असून त्यावरुन विशूनेमाने हे खाते असलेल्या अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक लिलाधर कानडे हे करीत आहेत.