Home क्राईम जळगावात आचारसंहितेचा भंग ; सहा जणांविरुध्द गुन्हा

जळगावात आचारसंहितेचा भंग ; सहा जणांविरुध्द गुन्हा


achar sanhita bhanag
 

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात लोकसभा निडणूकीची आचारसंहिता असतांना, विनापरवानगी मनपा नगरसेवकाच्या वाढदिवसाचे शुभेच्छा फलक लावल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलीसात सहा जणांविरुध्द महाराष्ट्र विद्रपीकरण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

महानगर पालिकेचे नगरसेवक सुनिल वामनराव खडके यांच्या वाढदिवसानिमित्त आकाशवाणी चौकात कुठलीही परवानगी न घेता वाढदिवसाचे फलक लावण्यात आले आहे. आचारसंहिता सुरु असतांना विनापरवानगी फलक लावल्याप्रकरणी चंद्रकांत बेंडाळे, किशोर ढाके, अरुण बोरोले, नितीन इंगळे, कवरलाल संघवी, चंदन महाजन या सहा जणांविरुध्द मनपाच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख अफीज उल्लाह खान यांच्या फिर्यादीवरून भाग-६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ. शिवाजी पवार करीत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound