Home क्राईम सुप्रिम कॉलनीत 16 वर्षीय मुलगा बेपत्ता

सुप्रिम कॉलनीत 16 वर्षीय मुलगा बेपत्ता


missing crime

जळगाव प्रतिनिधी । सुप्रिम कॉलनी राहणारा 16 वर्षीय पुतण्या काकाच्या घरातून बाहेरून येतो असे सांगत बाहेर पडला मात्र रात्री उशिरापर्यंत आणि गुरूवार दिवसभर घरी न आल्याने एमआयडीसी पोलीसात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, सुरेश सरिचंद जाधव (वय-45) रा. सुप्रिम कॉलनी, पांडे किराणा जवळ राहतात. त्याच्यासोबत त्यांचा पुतण्या श्याम मलखान जाधव (वय- 16) हा राहत होते. 24 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता बाहेरून येतो असे सांगून घराबाहेर गेला. रात्री उशीरापर्यंत आणि गुरूवार 25 एप्रिल रोजी रात्री पर्यंत मिळून आला नाही. सुरेश जाधव यांच्या महितीवरून एमआयडीसी पोलीसात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound