Home आरोग्य जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर कोरोना पॉझिटिव्ह

जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर कोरोना पॉझिटिव्ह

0
104


जळगाव प्रतिनिधी | जिल्हा बँकेचे चेअरमन तथा माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून ते होम कॉरंटाइन झाले आहेत

काल त्यांना अचानक त्रास जाणवू लागल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल प्राप्त होऊन चाचणीत देवकर हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले.

त्यांना कोरोना या आजाराची सौम्य लक्षणे असल्याने त्यांना होम कॉरंटाइन करण्यात आले आहे. आपल्या संपर्कात आलेल्या कार्यकर्त्यांना आपापली तपासणी करून घेण्याचे गुलाबराव देवकर यांनी आवाहन केले आहे.


Protected Content

Play sound