चाळीसगाव, प्रतिनिधी | शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधीत रूग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. मात्र आज जिल्हा प्रशासनाने पाठवलेल्या अहवालानुसार चाळीसगावात तब्बल २९ बाधीत रूग्ण आढळून आले आहे.
देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने जोरदार आगमन केले आहे. त्यात बाधीत रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. अशाच जिल्हा प्रशासनाने पाठवलेल्या अहवालात चाळीसगावात २९ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहे. त्यामुळे चाळीसगावकरांच्या चिंतेत अधिक भर पडल्याचे दिसून येत आहे. नगरपालिका व पोलिस प्रशासनाच्या वतीने विना मास्क धारकांवर संयुक्त दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. तरीही रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. हि अतिशय चिंताजनक बाब आहे. त्यामुळे विना मास्क घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.