Home आरोग्य वावडदा येथील एल.एच.पाटील इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांना लसीकरण

वावडदा येथील एल.एच.पाटील इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांना लसीकरण

0
103


जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील वावडदा येथील एल.एच.पाटील इंग्लिश स्कूलमध्ये जळके आरोग्य उपकेंद्र अंतर्गत १५ वर्षांवरील विद्यार्थ्यांसाठी कोवीड लसीकरण शिबीराला बुधवारी १२ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता सुरूवात करण्यात आली आहे.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला शिक्षण संस्थोचे अध्यक्ष एल.एच.पाटील यांच्याहस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या लसीकरण शिबीराला आरोग्यसेवक सलीम पिंजारी, ए.सी.पाटील, सुनिता सपकाळे, आशा वर्कर्स सरीता पाटील, जयश्री पाटील, मुख्याध्यापक जयश्री पाटील, शिक्षक दिपक सराफ, स्वाती पाटील, योगेश चव्हाण, लिपिक महेंद्र पाटील, भरत पाटील, संदिप पाटील, जळके आरोग्य उपकेंद्राचे सर्व सहकारी उपस्थित होते. लसीकरण शिबीर यशस्वितेसाठी शाळेचे शिपाई प्रमोद मोरे, विजय पवार, संतोष वाघ, असलम मण्यार, रामचंद्र चव्हाण यांनी परिश्रम घेतले. लसीकरण शिबीरात नववी व दहावीच्या एकुण ६८ विद्यार्थ्यांना लस देण्यात आली. शाळेतील लसीकरण केंद्रावर कोरोनाचे सर्व नियमांचे काटेकोर पालन करून लसीकरण करण्यात आले.

 


Protected Content

Play sound