जळगाव प्रतिनिधी | ‘नांदेड अमृतसर सचखंड एक्सप्रेस’ने उतरलेल्या दोन प्रवाश्यांनी कोरोना पॉझिटिव्ह असल्यावरही जळगाव रेल्वेस्थानकावर तपासणी पथकाशी हुज्जत घालत रुग्णालयात जाण्यास नकार दिला. त्यामुळे ‘तुम्ही संसर्गाचे ‘सुपर स्प्रेडर’ होऊ नका असे सांगत त्यांना जबरदस्तीने रुग्णालयात नेण्यात आले.
राज्याप्रमाणे जळगाव जिल्ह्यातही कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असून अधिक सावधानता बाळगत कोरोना नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. संसर्गाच्या तिसऱ्या लाटेच्या प्रसार प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या पार्श्वभूमीवर बाहेर गावाहून वा परराज्यातून जळगाव रेल्वे स्थानकावर उतरणाऱ्या प्रवाशांची आरोग्य तपासणी केली जात आहे. सोमवारी सांयकाळी नांदेड अमृतसर सचखंड एक्सप्रेसने उतरलेल्या दोन प्रवाशांची ‘थर्मल गन’द्वारे आणि तेथे असलेल्या किटद्वारे तपासणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, परंतु रुग्णालयात जाण्यासाठी हे दोन्ही प्रवासी संबंधित पथकाशी हुज्जत घालत असल्याने त्यांना अखेर जबरदस्तीने नेण्यात आले.
संसर्गाच्या तिसऱ्या लाटेच्या प्रसार प्रतिबंधात्मक उपाययोजना पार्श्वभूमीवर बाहेर गावाहून वा परराज्यातून जळगाव रेल्वे स्थानकावर उतरणाऱ्या प्रवाशांची आरोग्य तपासणी केली जात आहे. सोमवारी सांयकाळी नांदेड अमृतसर सचखंड एक्सप्रेसने उतरलेल्या दोन प्रवाशांची थर्मल गन द्वारे तपासणी झाली असता, तसेच तेथे असलेल्या किटद्वारे तपासणी दरम्यान पॉझिटिव्ह अहवाल आला, परंतु रुग्णालयात जाण्यासाठी हे दोन्ही प्रवासी संबंधित पथकाशी हुज्जत घालत असल्याने त्यांना अखेर जबरदस्तीने नेण्यात आले.
जळगाव जंक्शन स्थानकावर गेल्या १८ ते २० महिन्यापासून परराज्यातून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची आरोग्य तपासणी केली जात आहे. संसर्ग प्रसार प्रादुर्भाव प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत स्थानकावर येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची ‘थर्मल गन’द्वारे तापमान तपासणी होत आहे, सोमवारी दिवसभरात ५ पोझिटिव्ह रुग्ण आढळून आले, मनपा पथकातील कर्मचारी चांगरे यांनी, “रुग्णालयात तपासणीसाठी जाणे आवश्यक आहे” असे वारंवार सांगूनही पॉझिटिव्ह व्यक्तीने सुरुवातीला दाद दिली नाही तसेच स्थानकावर नियुक्त आरोग्य कर्मचाऱ्यांनादेखील दरडावले.
दरम्यान या सुशिक्षित तसेच कर्मचारी म्हणवणाऱ्या व्यक्तीने, “तपासणी झाली ना, आता रुग्णालयात आणखी कोणती तपासणी ? असे म्हणत सोडून द्या” असे सांगितले. परंतु तेथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी, “तुम्ही संसर्गाचे ‘सुपर स्प्रेडर’ होऊ नका” असे सांगितले. शेवटी मनपाचे चांगरे यांना संबंधित व्यक्तींना विश्वासात घेत शासकीय आयटीआय केंद्रात तपासणीसाठी घेऊन जाण्यात यश मिळाले.