Home Cities अमळनेर अमळनेरला संत गजानन महाराज मंदिरात ‘जागतिक पारायण दिवस’ संपन्न

अमळनेरला संत गजानन महाराज मंदिरात ‘जागतिक पारायण दिवस’ संपन्न

0
104

अमळनेर प्रतिनिधी | अमळनेर येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ‘संत गजानन महाराज मंदिरात’ कोरानाच्या नियमाचे पालन करून ‘जागतिक पारायण दिवस’ साजरा करण्यात आला.

अमळनेर येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जी.एम सोनार नगर येथील ‘संत गजानन महाराज मंदिरात’ कोरानाच्या नियमाचे पालन करून ‘जागतिक पारायण दिवस’ साजरा करण्यात आला.

सकाळी सहा वाजता संत गजानन महाराज मंदिरात आरती करण्यात आली. गजानन महाराज संस्थानच्या विश्वस्त ज्योतीताई राजेंद्र पवार यांनी गजानन विजय ग्रंथाचे वाचन केले. यावेळी गजानन परिवारातील महिला पारायणासाठी उपस्थित होत्या. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने जागतिक पारायण दिवस साजरा करण्यात आला.

यावेळी ‘देशावरील कोरोनाचे संकट दूर होण्या’साठी गजानन महिला भक्तांनी गजानन महाराजांना प्रार्थना केली. पारायण कार्यक्रमास संत गजानन महाराज संस्थानचे अध्यक्ष आर.बी. पवार व गजानन भक्त यांनी सहकार्य केले.


Protected Content

Play sound