साकळी येथे विद्यार्थ्यांनी टोचली कोरोना प्रतिबंधक लस

यावल, प्रतिनिधी | कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर तालुक्यातील साकळी येथील शारदा विद्या मंदिर विद्यालयातील १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. यावेळी एकूण १९० विद्यार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतली.

संपुर्ण देशात ओमायक्रॉनच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची धोक्कायाची घंटा वाजली आहे. राज्यात जिल्ह्यत व तालुक्यातील आरोग्य यंत्रणाही विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीकोणातुन सर्तक झाली आहे. शालेय विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे कार्यक्रम युद्धपातळीवर राबविले जात आहेत. या पाश्र्वभूमीवर तालुक्यातील साकळी येथील शारदा विद्या मंदिर विद्यालयातील १५ ते १८ वयोगटातील १९० किशोरवयीन मुलांना कोवीड १९ ची प्रतिबंधीत लस टोचून घेतली आहे. वैद्यकीय अधिकारी डाँ. झीशान तडवी यांचा मार्गदर्शनाखाली आरोग्यसेवक संजय आहिरराव ,संदिप पाटील, अरुण चौधरी, शेख सलाऊद्दीन, आरोग्य सेविका ममता सिस्टर, वाहन चालक शेख शोयब शकील आदींनी शिबिर यशस्वीतेसाठी करण्यासाठी परीश्रम घेतले.

यावेळी कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष वंसत रामजी महाजन, प्राचार्य जी.पी.बोरसे, पर्यवेक्षक एस जे पवार, केद्र प्रमुख किशोर चौधरी, समाधान कोळी यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षकतेर कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content