मुक्ताईनगर प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील ७ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा करा, अशा मागणीचे निवेदन आज विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेतर्फे मुक्ताईनगर तहसीलदार यांना देण्यात आले आहे.
निवेदनात दिलेल्याप्रमाणे, छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सातारा जिल्ह्यातील ७ वर्षीय चिमुकलीवर अमानुष व मानवतेला काळीमा फासणारे कृत्य करुन निष्पाप बालिकेची हत्या करणारा नराधाम, आरोपी संतोष धोरात याचा अत्यंत गंभीर व लाजिवणारा गुन्हा देबेवाडी पोलीसांनी तात्काळ उघडीस आणुन आरोपीस अटक करुन त्याचेवर पोस्को कायद्यान्वये गुन्हे दाखल केले आहेत. त्याबद्दल पोलीस प्रशासनाचे महाराष्ट्रातील तमाम समाज बांधव ऋणी आहेत.
अशा प्रकारच्या अमानुष व मानवतेला काळीमा आणाणारे कृत्याची पुनरावृत्ती होवु नये, यासाठी तसेच चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपी संतोष थोरात यास मरेपर्यंत फाशिची शिक्षा व्हावी, जेणे करुन कुठेही अशी घटना पुन्हा होणार नाही. तसेच सदर आरोपीस फाशीची शिक्षा न झाल्यास समस्त समाज बांधव तीव्र आंदोलन करु, यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, याची कृपया नोंद घ्यावी. असे यावेळी सांगण्यात आले आहे.
यावेळी निवेदन देतांना रवींद्र जंजाळकर, सुधाकर बोरेकर, आरडी मिस्तरी, भास्कर जंजाळकर, रामदास रुले, संतोष दांडगे, शंकर व्हीरोळकर, अनुप रुले, जयेश रुले यांच्यासह सर्व विश्वकर्मा वंशीय संघटना मुक्ताईनगर तालुका हे उपस्थित होते.