Home Cities अमळनेर धानोरा येथील रस्त्याचे आ. अनिल पाटलांच्या हस्ते भूमीपूजन

धानोरा येथील रस्त्याचे आ. अनिल पाटलांच्या हस्ते भूमीपूजन

0
117

अमळनेर, प्रतिनिधी | शेतकरी व ग्रामीण जनतेला शहराशी जोडून पूरक व्यवसायास चालना देण्याचा आपला प्रयत्न असल्याचे आ.अनिल पाटील यांनी सांगितले. ते धानोरा येथील रस्त्याच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते.

धानोरा येथे आमदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत १५ लक्ष निधीतून धानोरा फाटा ते धानोरा रस्ता डांबरीकरण करण्यात येणार आहे. तत्पूर्वी या कामाचे भूमिपूजन आणि धानोरा गावात १० लक्ष निधीतून झालेल्या काँक्रेटिकरण कामाचे लोकार्पण आमदार अनिल भाईदास पाटील व जि.प.सदस्या जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी तरवाडे सरपंच रामकृष्ण पाटील ,धानोरा सरपंच दिलीप ठाकरे, उपसरपंच अमोल दिलीपसिंग पाटील, शिंदे सर, शालिक ठाकरे, राजाराम ठाकरे, गुलाबराव शिंदे, शरद शिंदे, चेतन शिंदे, शांताराम ठाकरे, नितीन पाटील छबीलाल ठाकरे, रामदास भिल, सुनील पवार, प्रदिप ठाकरे, छबिलाल भिल, हिम्मतराव ठाकरे यासह ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान धानोरा फाटा ते धानोरा रस्त्याची दुरावस्था झाली असताना आ.अनिल पाटील यांनी ही प्रमुख समस्या सोडविल्याने सर्व उपस्थित ग्रामस्थांनी आमदारांचे विशेष आभार मानले.


Protected Content

Play sound