भुसावळ स्थानकावरील नूतन प्लॅटफॉर्मचे लोकार्पण


 

bfdc43e6 73e2 4942 9c2f c01e29c9e9dc

भुसावळ (प्रतिनिधी) मध्य रेल्वेच्या येथील नव्याने बांधण्यात आलेल्या प्लॅटफॉर्मचे लोकार्पण आज (दि.२४) विभागीय रेल्वे व्यवस्थापक आर.के.यादव यांच्या हस्ते करण्यात आले.

 

यावेळी यादव यांनी प्लॅटफॉर्मची पूजा करून गाड़ी क्र.५९०७६ भुसावळ सुरत पॅसेंजर या गाडीला सकाळी८-४५ वाजता हिरवी झेंडी दाखवून गाडी रवाना केली. या कार्यक्रमास वरिष्ठ विभागीय अभियंता (समन्वय) राजेश चिखले, मुख्य चिकित्सा अधिकारी डॉ.सामंतराय, वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता (टीआरडी) प्रदीप ओक, वरिष्ठ विभागीय सिग्नल-दूरसंचार अभियंता निशांत द्रिवेदी, वरिष्ठ विभागीय वाणिज्य प्रबंधक आर.के. शर्मा, वरिष्ठ विभागीय यांत्रिक अभियंता लक्ष्मीनारायण, वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता जी.के. लखेरा, वरिष्ठ विभागीय संरक्षा अधिकारी एन.के. अग्रवाल, रेल्वे स्थानक संचालक जी.आर.अय्यर, स्टेशन प्रबंधक मनोजकुमार श्रीवास्तव, कंत्राटदार राजू सुराणा यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here