Home धर्म-समाज रावेर येथे समाजासाठी एक आदर्श निर्माण सावित्रीच्या लेकींचा सन्मान (व्हिडीओ)

रावेर येथे समाजासाठी एक आदर्श निर्माण सावित्रीच्या लेकींचा सन्मान (व्हिडीओ)

0
27

रावेर प्रतिनिधी | क्रांतीज्योती, सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अनुषंगाने रावेर येथील ‘खानदेश माळी महासंघा’ने समाजासाठी एक आदर्श निर्माण करणाऱ्या पाच सावित्रीच्या लेकींचा सन्मान केला.

“समाजासोबत कुटुंबाचा उध्दार करणा-या खऱ्या सावित्रीबाईच्या लेकी आहे. आणि त्यांचा आर्दश इतर महिलांनी घेण्याचे आवाहन” साहित्यिक, प्रा व पु होले यांनी केले. रावेर येथे ‘खानदेश माळी महासंघा’तर्फे पाच सावित्रीच्या लेकींचा सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

यावेळी माजी रावेर नगराध्यक्षा डॉ. रंजना अकोले, मुलाच्या शिक्षणासाठी मंगळसूत्र विकणारी अनुसया महाजन, स्वतःच्या पतीला किडनी दान करणारी लता राजू , मोसे उपशिक्षिका हेमलता चौधरी, शिंगाडी येथील लोकनियुक्त सरपंच कविता बगाडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक पिंटू महाजन यांनी केले

 व्हिडीओ लिंक

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/599559264674436


Protected Content

Play sound