चोरीला गेलेली सायकल जिल्हापेठ पोलीसांनी केली परत

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील द्रौपती नगरातून एकाची १३ हजार रूपये किंमतीची चोरीस गेलेली सायकल जिल्हापेठ पोलीसांनी चोरट्याला पकडून सायकल जप्त केली आहे. शुक्रवारी ३१ डिसेंबर रोजी दुपारी पोलीसांनी फिर्यादीस सायकल परत केली आहे.

 

याबाबत माहिती अशी की, शहरातील द्रौपती नगराती रहिवाशी ॲड. योगेश शरद महाजन यांची २० मार्च २०२१ रोजी त्यांच्या घरासमोरून मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने १३ हजार रूपये किंमतीची सायकल चोरून नेल्याचे उघडकीला आले होते. याप्रकरणी योगेश महाजन यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीसांनी शोध सुरू केला होता. गुन्ह्यातील चोरीस गेलेली सायकल ही ईस्माईल अली राजीव अली रा. तांबापूरा जळगाव यांच्याकडे मिळून आली. त्यानंतर संशयितावर कारवाई करत चोरीचा सायकल हस्तगत केली. सायकलीचे मुळ कागदपत्र दाखल शुक्रवारी ३१ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या उपस्थितीत सायकल मुळ मालाकाला परत करण्यात आली आहे.

 

Protected Content