रावेर, प्रतिनिधी | अवैध वाळूचे वाहतूक करणारे ट्रॅक्टर आज महसूल पथकाने पकडले असून वाळूंची तस्करी करणाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. तत्पूर्वी ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहे.
रावेर येथे अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर ट्रॉली आज महसूल पथकाने पकडले आहे. यामुळे वाळूंची तस्करी करणाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान सदर ट्रॅक्टर हे जप्त करण्यात आले आहे. ऐनपूर तलाठी, रावेर मंडळ अधिकारी, रावेर तलाठी खानापूर, तलाठी दसनुर ,मंडळ अधिकारी निंभोरा ,तलाठी रावेर तलाठी पाल कोतवाल खिरवड, कोतवाल थेरोळा,कोतवाल निंबोल,कोतवाल रावेर आदींनी हि कारवाई केली आहे. दरम्यान रावेर परिसरात रात्रीच्या वेळी अवैध वाळूची मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. याकडे तहसिलदार यांनी लक्ष देण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.