पो.नि मोरे यांची त्वरित बदली करावी – ना. पाटील (व्हिडीओ)

Gulab patil

धरणगाव (प्रतिनिधी) शहरात सायंकाळी पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांच्या मनमानीविरुध्द करण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी सदर पोलीस निरीक्षकाची त्वरित बदली करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

 

पो.नि. मोरे यांनी अधिकाराचा गैरवापर करून आज अनेकांना मतदान करण्यापासून वंचित ठेवल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे मोरे यांची तक्रार आपण निवडणूक आयागाकडे केली असून त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. शासन एकीकडे मतदानाला प्रोत्साहन देत असताना हे पोलीस निरीक्षक मात्र शासनाच्या धोरणाला हरताळ फासत असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.

Add Comment

Protected Content