Home धर्म-समाज पाचोरा येथे जे.सी.आय.चा ३० वा पदग्रहण सोहळा उत्साहात

पाचोरा येथे जे.सी.आय.चा ३० वा पदग्रहण सोहळा उत्साहात

0
29

पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा येथील जे. सी. आय. चा ३० वा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न झाला.

मागील वर्षीच्या अध्यक्ष जे. सी.  मयूर दायमा यांनी नूतन वर्षाच्या अध्यक्ष जे. सी. आर्किटेक्ट रोहित रिझानी यांना शपथ देऊन पदभार दिला. यावेळी आर्किटेक्ट रोहित रिझानी यांनी सन – २०२२ चे अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. याप्रसंगी त्यांचा सोबत सचिव जे. सी. पियुष अग्रवाल, जे. सी. आयुष्य केसवानी सह २० नवीन सदस्यांनी पदग्रहणा शपथ घेतली.

याप्रसंगी जे. सी. मयूर डायमा यांनी त्यांचा कार्यकाळाचा आढावा सादर केला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पंकज बांठिया, व प्रमुख वक्ते म्हणून रवी केसवानी, सह झोन ऑफिसर आंचल उपाध्यक्ष जे. सी. आनंद भागवत यांचा सोबत जीवन  जैन, दिनेश बोथरा, गोपाल पटवारी, रितेश ललवाणी, पियुष संचेती, अमोल शिंदे, पुनीत बाजोरिया, राहुल जैन, अंकित अग्रवाल, अपूर्व थेपडे, पार्थ खंडेलवाल, दिनेश अग्रवाल (सी. ए.) तसेच पत्रकार बांधवांसह जे. सी. आय. चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound