जळगाव, प्रतिनिधी | शहरातील मेहरूण परिसरात असणार्या गोडाऊनला रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली असून अग्नीशामन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
या संदर्भात वृत्त असे की, शहरातील मेहरूण परिसरातील महादेव मंदिराच्या परिसरात असलेल्या गोडाऊनला रात्री नऊच्या सुमारास भीषण आग लागली. काही मिनिटांमध्येच आगीचे लोळ उठत असल्याचे पाहून परिसरातील नागरिकांनी तातडीने अग्नीशामन दलास पाचारण केले. महापालिकेच्या फायर फायटर कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्यास प्रारंभ केला.
अग्नीशामन दलाच्या पथकाने शर्थीचे प्रयत्न करून आग विझवण्यास प्रारंभ केला असून शेवटचे वृत्त हाती आले तेव्हापर्यंत आग पूर्णपणे विझली नव्हती. दरम्यान, या आगीत नेमके किती रूपयांचे नुकसान झाले याची माहिती देखील समोर आली नव्हती.
अग्निशमन दलाचे वाहन चालक संतोष तायडे, जगदीश साळुंखे सरदार पाटील, गोलानी मुख्यालय वाहन चालक नासिर अली, रोहिदास चौधरी, पन्नालाल सोनवणे ,राजेंद्र चौधरी, परमेश्वर सोनवणे, निवांत इंगळे वाहन चालक, सोपान जाधव, राजमल पाटील प्रकाश कुमावत, मदन जराळ, प्रकाश सपकाळे,नितीन बारी यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी परिश्रम घेतले.