Home Cities जळगाव प्रोग्रेसिव्ह इंग्लिश स्कूलमध्ये मतदान केंद्राचे सुशोभिकरण (व्हिडीओ )

प्रोग्रेसिव्ह इंग्लिश स्कूलमध्ये मतदान केंद्राचे सुशोभिकरण (व्हिडीओ )


progressive

जळगाव प्रतिनिधी । आदर्श मतदान केंद्र म्हणून आज खॉजामिंया चौकात असलेल्या प्रोग्रेसिव्ह इंग्लीश मिडीयम स्कुलची ओळख तयार झाली होती. यावेळी मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार व्हावे यासाठी शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ स्वागतद्वार उभारण्यात आले होते. सोबत या द्वाराला आकर्षकरित्या फुग्यांनी सजविले होते.

शाळेच्या मुख्‍य गेटपासून ते मतदान केंद्राच्या खोलीपर्यंत मतदारांसाठी कार्पेट टाकण्यात आला होता. तर मतदानास आलेल्या विवाहित महिलांच्या लहान मुलांसाठी हिरकणी कक्षाची उभारणी केली होती तसेच हिरकणी कक्षात लहान मुलांसाठी खेळण्याचे साहित्य देखील उपलब्ध करून देण्यात आले होते. दरम्यान सदरील शाळेत चांगल्यारितीने सजावट केली असल्यामुळे नवमतदार यांना पहिले मतदान चांगल्या वातावरणात झाले हा क्षण कायमस्वरूपी कैद करण्यासाठी सेल्फीचा मोह आवरता आला नाही.

पहा । शाळेतील सजावट कशी केली आहे ते बघा !


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound