जळगाव प्रतिनिधी । औद्योगिक वसाहत पोलीस स्थानकाच्या हद्दीत असलेल्या रामेश्वर कॉलनीत विना परवाना अवैधरित्या देशी आणि विदेशी दारू विक्री करणाऱ्या एकावर छापा टाकून ताब्यातील साडे आठ हजार रूपये किंमतीचा दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहे. याबाबत एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रामेश्वर कॉलनीत विना परवाना अवैधरित्या दारूची विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहम यांना मिळाल्यानंतर त्यांनी एक पथक तयार करून पथकातील हे.कॉ. चंद्रकांत पाटील, रविंद्र गिरासे, सुनिल दामोदरे, दिनेश बडगुजर, विजय पाटील, विजय शामराव पाटील, नरेंद्र वारुळे, प्रकाश महाजन, महिला मिनल साकळीकर, दिप्ती अनफट, दिपक चौधरी यांनी कारवाई करत रामेश्वर कॉलनीच्या भागात आरोपी विनोद अशोक महाजन यांच्या घरी छापा टाकून त्याच्या ताब्यातील 8 हजार 984 रूपयांच्या देशी आणि विदेशी दुरूचा साठा मिळून आला असून त्यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.