Home Uncategorized धानोऱ्यात मतदानाला सुरुवात;मतदारांमध्ये प्रचंड उत्साह

धानोऱ्यात मतदानाला सुरुवात;मतदारांमध्ये प्रचंड उत्साह


dhanora
 

धानोरा ता.चोपडा (वार्ताहर) लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात आज (मंगळवारी) राज्यातील १४ मतदारसंघांमध्ये मतदानाला सुरुवात झाली आहे. धानोरा येथे देखील आज सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साह दिसून आला.

 

तिसऱ्या टप्प्यात आज सुमारे अडीच कोटी मतदार २४९ उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचा निर्णय मतदानयंत्रात बंद करणार आहेत. तिसऱ्या टप्प्यात देशभरात एकूण ११६ जागांसाठी मतकौल दिला जाणार आहे. धानोऱ्यातील जवळपास सर्वच मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांनी रांगा लावल्या होत्या. सकाळीच मतदानाला उत्साह दिसून आल्यामुळे मतदानाची एकूण टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, धानोरा ता.चोपडा येथिल जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत अपंग मतदार नाना रामदास सोनवणे यांनी मतदान केले.

 

502af16b 9c1e 485e 87df 5920d438a862
 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound