Home Cities पाचोरा पाचोऱ्यात शाळेची वाजली घंटा : विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

पाचोऱ्यात शाळेची वाजली घंटा : विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

0
26

पाचोरा प्रतिनिधी । निर्मल इंटरनॅशनल स्कूलमध्ये आजपासून प्राथमिक वर्ग सुरू झाले असून विद्यार्थ्यांचा पहिलाच दिवस असल्याने विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

शाळेच्या प्रांगणात विदयार्थ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली होती. रंगेबिरंगी फुग्यांची कमान तयार करून शाळेच्या मुख्य दरवाजाजवळ लावण्यात आलेली होती. वर्ग खोल्या फुग्यांनी सजवल्या होत्या. विद्यार्थी व शालेय कर्मचाऱ्‍यांचे थर्मल स्कीनींग, ऑक्सिमीटर तपासणी करून सामाजिक अंतराचे पालन करण्यात आले. शालेय प्रशासनातर्फे शाळेच्या संपूर्ण वर्गखोल्यांचे निर्जतुकीकरण करण्यात आले होते. याप्रसंगी शाळेच्या अध्यक्षा वैशाली सुर्यवंशी, सचिव नरेंद्रसिंग सुर्यवंशी प्राचार्य गणेश राजपूत, उपप्राचार्य प्रदिप सोनवणे प्रशासकीय अधिकारी संतोष पाटील तसेच शाळेतील सर्व शिक्षकांनी विदयार्थ्यांचे स्वागत केले. विदयार्थी, शिक्षक आणि पालक यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते.

 


Protected Content

Play sound