राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया अमळनेर तालुकाध्यक्षपदी सचिन वाघ

अमळनेर प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मिडिया अमळनेर तालुकाध्यक्षपदी डांगर बु. येथील क्रियाशील कार्यकर्ते सचिन वाघ यांची निवड करण्यात आली.

नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत जिल्हाध्यक्ष यांच्या आदेशान्वये तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी केली आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, आ. अनिल पाटील, जि.प. सदस्या जयश्री पाटील, माजी आ. कृषिभूषण पाटील, नगराध्यक्षा पाटील, बाजार समिती मुख्य प्रशासक तिलोत्तमा पाटील, कार्याध्यक्ष प्रा.सुरेश पाटील, विधानसभा क्षेत्राप्रमुख भागवत पाटील, शहराध्यक्ष मुक्तार खाटीक, एल टी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस युवक जिल्हा उपाध्यक्ष गौरव पाटील, गोविंदा बाविस्कर, राष्ट्रवादी युवक ता.अध्यक्ष श्रीनाथ पाटील, शहराध्यक्ष सुनिल शिंपी, अनिरुद्ध शिसोदे, भूषण भदाणे, निनाद शिसोदे, शुभम बोरसे आदींनी अभिनंदन व शुभेच्छा दिल्या आहेत.

आ.अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळात ग्रामीण भागात सोशल मीडियाच्या कार्यकर्त्यांचे जाळे उभारून पक्षाचे ध्येय धोरणे सामान्य जनतेपर्यंत पोहचवण्याचं काम सोशल मीडिया विभागातर्फे करण्यात येणार असल्याचे सचिन वाघ यांनी सांगितले.

Protected Content