यावल( प्रतिनिधी) तालुक्यातील यावल फैजपुर रोडवर आज दुपारी कार चालक ट्रकला ओव्हरटेक करत असतांना अपघात होवुन त्यात दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
या संदर्भात फैजपुर पोलीसांनी दिलेली माहीती अशी की. आज सोमवार २२ एप्रील रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास यावल फैजपुर रोडवर हंबड्री गावाजवळील जीनिंग प्रेसिंगजवळ (एम.एच. १४ झेड१९११) या क्रमांकाची कार ही यावल येथून फैजपुरकडे जात असतांना गाडीतील योगेश अनंतराव भोसले (रा. भडगाव पाचोरा, ह. मु. पुणे) हे एका ट्रकला ओव्हरटॅक करीत असतांना अपघातात झाला. या अपघातात योगेश भोसले आणि अविनाश अप्पा पाटील (रा. चोपडा) हे गंभीर जखमी झालेत. याबाबत फैजपुर पोलीस स्टेशनमध्ये अपघाताची नोंद करण्यात आली असून, तपास फैजपुर पोलीस स्टेशनचे सहायक फौजदार राजेश बऱ्हाटे हे करीत आहे.