Home क्राईम जळगावात गैरसमजातून एकाला लाकडी दांड्याने मारहाण

जळगावात गैरसमजातून एकाला लाकडी दांड्याने मारहाण

0
109


जळगाव प्रतिनिधी । शहरातील पिंप्राळा परिसरातील मढी चौकात गैरसमजातून एकाला लाकडी काठीने बेदम मारहाण केल्याची घटना १० डिसेंबर रोजी सायंकाळी घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, संतोष चव्हाण रा. मढी चौक, पिंप्राळा हे पतनी बेबी संतोष चव्हाण यांच्यासह वास्तव्याला आहे. शुक्रवार १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास संतोष चव्हाण हे घरी असतांना त्यांच्या गल्लीतील नितेश मिलींद जाधव (वय-२२) याने आईला वाईट का बोलला या गैरसमज झाल्याच्या कारणावरून इतरांनी लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. यात संतोष चव्हाण यांनी गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी शनिवारी ११ डिसेंबर रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी नितेश जाधव याच्यासह इतर दोन अज्ञात व्यक्तींविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक अनमोल पटेल हे करीत आहे.


Protected Content

Play sound