जळगाव प्रतिनिधी । शहरातील समता नगरातील तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून अत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीला आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सुधीर नाना साळुंखे (वय-३३) रा. समता नगर असे मयत तरूणाचे नाव आहे.
रामानंदनगर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधीर साळुंखे हा तरूण आईवडील, पत्नी व भाऊ सोबत समता नगरात वास्तव्याला आहे. तो सुरत येथे वास्तव्याला होते. कोरोनामुळे कामाकाज बंद झाल्यानंतर ते पत्नीसह जळगावला आले होते. सध्या ते नोकरीच्या शोधात होते. शनिवारी ११ डिसेंबर रोजी रात्री कुटुंबियांसह जेवण करून सर्वजण झोपले होते. मध्यरात्री सर्वजण झोपलेले असतांना सुधीर साळुंखे यांनी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याचे सकाळी उघडकीला आले. आत्महत्या केल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुंबियांनी एकच आक्रोश केला होता. घटनेची माहिती मिळताच रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होवून पंचनामा केला. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक अतुल चौधरी करीत आहे. मयत सुधीरच्या पश्चात आई मालूबाई, वडील नाना साळुंखे, भाऊ मुकेश, पत्नी मोनाली, मुलगी पुर्वा आणि दीड वर्षाचा मुलगा असा परिवार आहे.