Home आरोग्य जळगावात मोफत मोतीबिंदू तपासणी शिबीर

जळगावात मोफत मोतीबिंदू तपासणी शिबीर

0
44


जळगाव प्रतिनिधी । जळगावचे भवरलाल, कांताबाई जैन फांऊडेशन यांच्यातर्फे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रावेर यांच्यातर्फे शुक्रवारला मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिर घेण्यात आले.

संपन्न शिबिरात  120 रुग्णांची तपासणी व त्यापैकी तीस रुग्णांना शस्त्रक्रिया होणार. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या  जन्मदिनानिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला.

येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नेत्र तपासणी शिबीर झाले नेत्रचिकित्सक अभिषेक पायाशी यांनी नेत्रतपासणी केले अध्यक्षस्थानी रावेर तालुका अध्यक्ष निळकंठ चौधरी होते. प्रसंगी, शहराध्यक्ष मेहमूद भाई पंचायत समिती सदस्य योगेश पाटील ,सामाजिक न्याय विभाग तालुकाध्यक्ष   जितेंद्र साबळे ,सामाजिक कार्यकर्ते भागवत चौधरी ज्येष्ठ पत्रकार देवलाल पाटील आदींची उपस्थिती होती.

कांताई नेत्रालया चे कॅम्प मॅनेजर युवराज देसरडा यांनी  शिबिरार्थींना मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जयेश पाटील, शाहू फुले आंबेडकर वाचनालयाचे अध्यक्ष राजेंद्र आटकाळे, खानदेश माळी महासंघ तालुकाध्यक्ष पिंटू महाजन, रामकृष्ण महाजन यांनी परिश्रम घेतले.

 

 


Protected Content

Play sound