पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील बांबरूड राणीचे येथील सरपंच राजेंद्र ओंकार वाघ यांचे आज आकस्मिक निधन झाले.
राजेंद्र ओंकार वाघ यांना आज सकाळी अकराच्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तातडीने उपचारासाठी जळगाव येथे घेऊन जात असतांनाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर उद्या दिनांक २३ एप्रिल रोजी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ते माजी आमदार दिलीप वाघ आणि पीटीसीचे चेअरमन संजय वाघ यांचे ज्येष्ठ बंधू होत. तर ते पंचायत समितीचे गटनेते ललीत वाघ यांचे वडील होत. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.