मतदान करा जेवणात १५ टक्के सूट मिळवा

untitled 15 1535086241

रावेर (प्रतिनिधि)   मतदानाचा टक्केवारी वाढविण्यासाठी प्रशासन अनेक बाबींवर लक्ष केंद्रित करत आहे. मात्र टक्केवारी वाढेल की नाही याची चिंता प्रशासन व उमेदवारांना आहे.  रावेर येथील हॉटेल मालकाने मतदानाचा टक्का वाढावा यासाठी अनोखा फंडा आणला आहे.

 

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशानातर्फे जनजागृती करण्यात येत असतांना मतदान केलेल्या मतदाराला रावेरातील हॉटेल धनराजमध्ये बिलात १५  टक्के पर्यंत सूट देण्याचे मालक कालू बारी  यांनी जाहीर केले आहे.  ‘तिकडे दाबा बटन आणि मग येऊन खा मटण’ अशी आगळी वेगळी योजना रावेरसाठी जाहीर झाली आहे.  लोकसभा निवडणुकीत प्रचार  संपला आहे.  नेते मंडळीनी प्रचारादरम्यान आरोप-प्रत्यारोप झाडत गावोगावी प्रचार यंत्रणा जोमात राबविली. सोशल मीडिया, बॅनर्स लावलेल्या रिक्षा सर्व लवाजमा धामधुमीत होती. उदया मतदानाचा हक्क  बजावणा-या मतदाराला  मटनाच्या बिलात १५  टक्के सूट दिले जाणार आहे.  मतदानाचा टक्का वाढवा यासाठी  प्रशासन देखील त्यांच्या पातळीवरजास्तीत जास्त  प्रयत्न करत आहे.   अभियानात सहभागी होणाऱ्या प्रत्येक मतदाराने मतदान करून आपल्या हॉटेलमध्ये जेवण केले तर त्या मतदाराच्या बिलात १५  टक्के सूट दिली जाणार आहे अशी योजना रावेर येथील आठवडे बाजारातील हॉटेल धनराजचे मालक कालू बारी  यांनी जाहीर केली  आहे.

Add Comment

Protected Content