Home क्राईम बंद घरात आढळला प्रौढाचा मृतदेह

बंद घरात आढळला प्रौढाचा मृतदेह

0
36

जळगाव प्रतिनिधी | शहरातील शिव कॉलनी परिसरातील एका बंद असलेल्या घरात प्रौढाचा मृतदेह आढळून आला असून त्यांचा झोपेतच मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, प्रभाकर डिगंबर लांडे (वय-५७) रा. शिव कॉलनी हे पत्नी शोभा यांच्यासह वास्तव्याला आहे. त्यांची पंकज आणि राहुल ही दोन्ही मुले बाहेरगावी नोकरीला असल्यामुळे प्रभाकर लांडे व पत्नी शोभा लांडे हे दोघेच घरी राहत होते. दरम्यान त्यांचा मुलगा राहुल हा मुंबईत नोकरीला असल्यामुळे त्याच्याकडे राहण्यासाठी शोभा लांडे ह्या काही दिवसांपूर्वी गेल्या होत्या. त्यामुळे प्रभाकर लांडे हे घरात एकटेच होते. त्यामुळे ते पत्नी शोभा यांच्या संपर्कात होते. ५ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता त्यांचे बोलणे झाले होते. त्यानंतर शोभा लांडे यांचा पती प्रभाकर लांडे यांच्याशी संपर्क झाला नाही. त्यावेळी चिंतेत असताना ७ डिसेंबर रोजी सायंकाळी शेजारी राहणारे भोळे यांच्याशी संपर्क साधून घरी जाण्यास सांगितले.

या अनुषंगाने भोळे हे गेले असतांना घरातील दरवाजा आतून बंद असल्याच्या दिसून आल्यानंतर एकाने बाजूच्या इमारतीवरून उडी घेत आत प्रवेश केला तर प्रभाकर लांडे यांचा मयतस्थितीत मृतदेह आढळून आला. याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत कळसकर यांच्या खबरीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल सागर देवरे करीत आहे. मयताच्या पश्चात पत्नी शोभा, राहुल आणि पंकज हे दोन मुले असा परिवार आहे.


Protected Content

Play sound