अपंग मतदारांना संस्कृती फाउंडेशनचे स्वयंसेवक करणार मतदानासाठी मदत (व्हीडीओ)

bhusawal sanskruti faundation

भुसावळ (प्रतिनिधी) यंदा लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारांने आपला मतदानाचा हक्क बजवावा. तसेच जास्तीत जास्त मतदान व्हावे, या हेतूने शारीरिकदृष्ट्या अपंग मतदारांना मतदान केंद्रापर्यत पोहचण्यास संस्कृती फाउंडेशनचे सदस्य मदत करणार आहेत.

 

यंदा निवडणुकीत तालुक्यात सुमारे १६०० शाररिक दृष्टी विकलांग मतदार आहेत. त्याचे मतदान वाया जाऊ नये म्हणून संस्कृती फाउंडेशन अपंग असणाऱ्या मतदारांना मतदान केंद्रापर्यत पोहचण्यास मदत करणार आहे. या संदर्भात प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर व तहसीलदार सतीश निकम यांनी संस्थेच्या स्वयंसेवकांना याबाबत परवानगी दिली आहे. संस्कृती फाऊंडेशनचे सुमारे ४० स्वयंसेवक भुसावळ तालुक्यातील दिव्यांग मतदारांकडून मतदान करून घेणार आहेत. या उपक्रमात प्रशासनाकडून त्यांना व्हीलचेअर सारख्या साहित्यांची मदत मिळणार आहे. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर थांबून विकलांग मतदारांना मदत करण्यात येणार आहे.

 

दरम्यान, सामाजिक कार्य करण्यात तसेच प्रशासनाला मदत करण्यासाठी संस्कृती फाउंडेशन नेहमीच पुढे असते. यंदा लोकसभा निवडणुकीत शाररिक दृष्टीने विकलांग असलेल्या मतदारांना एक हाथ मदतीचा ह्या उपक्रमा अंतर्गत मदत मिळणार असल्याची प्रतिक्रिया संस्कृती फाउंडेशनचे अध्यक्ष रणजितसिंग राजपूत यांनी दिली आहे.

Add Comment

Protected Content