Home धर्म-समाज पाचोरा शहरातील स्टेट बँकेत ग्राहकांची तारांबळ

पाचोरा शहरातील स्टेट बँकेत ग्राहकांची तारांबळ

0
33

पाचोरा, प्रतिनिधी | पाचोरा शहरातील स्टेट बँकेत कर्मचारी संख्या कमी असल्याने ग्राहकांची तारांबळ उडाली असून त्यांना त्रास सोसावा लागत आहे.

शहरातील सरदार वल्लभभाई मार्गावरील स्टेट बँक ऑफ इंडिया ही मुख्य शाखा असून या शाखेत परिसरातील सुमारे १ लाख ग्राहक जोडलेले आहेत. मात्र शाखेत येणाऱ्या वृद्ध नागरिकांना तत्पर सेवा देण्यास सदरहु शाखा सपशेल फेल होतांना दिसून येत आहे.

अनेक ग्राहक आपली बॅंकेची कामे करण्यासाठी या शाखेत येत असतात. परंतू त्यांची कामे होत नसल्याने ग्राहकांमध्ये कमालीचा नाराजीचा सूर दिसून येत आहे. कमी कर्मचारी संख्येअभावी ग्राहकांना आपली दैनंदिन कामे सोडून वारंवार बॅंकेच्या हेलपाट्या माराव्या लागत आहे. बँकेत होणाऱ्या गैरसोयीविषयी वडगाव बु. येथील नाना कुमावत यांनी ‘लाईव्ह ट्रेंन्डस न्यूज’शी संवाद साधून आपल्या व्यथा मांडल्या आणि संबंधितांनी यावर चौकशी होऊन उचित निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली.


Protected Content

Play sound