मुक्ताईनगर प्रतिनिधी | मुक्ताईनगर येथील प्रवर्तन चौकात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
आज सोमवार, दिनांक ६ डिसेंबर रोजी प्रवर्तन चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करुन मनसेच्या वतीने डॉ.बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल काळे, तालुकाअध्यक्ष, मनसे पदाधिकारी, ग्रा.प.सदस्य मधु भोई, विधानसभा अध्यक्ष जनहित कक्ष अतुल जावरे, तालुका उपाध्यक्ष श्रीराम भोई, मंगेश कोळी, मुकेश झाल्टे, अंतूलीं गण अध्यक्ष यश पाटील, गजू पाटील, पंकज बोर्डे, दुर्गेश देशमुख, अक्षय पाटील, आयुष्य सोनार, धीरज पाटील, तेजस पाटील, मनीष खर्चे, अक्षय देशमुख, तन्मय पाटील, सागर पाटील, अश्विन निंबाळकर, अक्षय हारगडे, भूषण हारगडे, हर्षल पाटील, सौरव,सायखेडे, सचिन पाटील आदींची कार्यक्रमास उपस्थिती होती.