सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार अनिल चौधरी यांचा वाढदिवस !

यावल प्रतिनिधी | सध्या सुरू असणारी कोरोनाचा संसर्ग आणि नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्‍वभूमिवर प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख अनिल चौधरी यांनी आपला वाढदिवस साजरा न करता विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्याचे जाहीर आवाहन केले आहे.

प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख अनिल छबीलदास चौधरी यांचा वाढदिवस ८ डिसेंबर रोजी असून या दिवशी नेहमी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केलेले असते. मात्र यंदा कोरोनाचा नव्याने संसर्ग उफाळून आला असून नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकर्‍यांना मोठा फटका बसला आहे. या पार्श्‍वभूमिवर, यंदा वाढदिवस साजरा न करता आपल्या चाहत्यांनी समाज उपयोगी उपक्रम राबविण्याचे आवाहन अनिल चौधरी यांनी केले आहे.

अनिल चौधरी यांनी या संदर्भात सोशल मीडियात आपल्या चाहत्यांना आवाहन केले आहे. या आवाहनात म्हटले आहे की-

”08 डिसेंबर हा माझा जन्मदिवस… दरवर्षी या दिवशी तुमच्या शुभेच्छा आणि आशिर्वाद हे भरभरुन मला देत आलात. आपल्या सर्वांचे प्रेम हिच माझी खरी ठेव आहे. परंतु सध्या महाराष्ट्रात ‘ओला दुष्काळ, पूर आणि आता अवकाळी पाऊस’ यामुळे आपले शेतकरी, कष्टकरी बांधव आणि इतर रयत संकटात आहेत. अशावेळी, जन्मदिवस नेहमीप्रमाणे साजरा करणे मला उचित वाटत नाही..

माझ्या स्नेहाकिंत असणाऱ्या मित्र आणि स्नेहीजनहो कार्यकर्त्यांनो वाढदिवसा निमित्त कोणताही अवास्तव कार्यक्रम न घेता गरजूंना मदत करणारा उपक्रम राबवावा असे आवाहन करतो. वायफळ खर्चा होर्डिंग बॅनर्स न लावता आपल्या साठी रात्रं दिवस झटणाऱ्या माय माऊली म्हणजेच आपल्या परिचारिका भगिनींचा सम्मान करा, अपंग व्यक्ती ला मदत करा, गरजूंना ब्लँकेट वाटप करा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा एवेजी सामाजिक कार्य करून एखाद्या गरीब कुटूंबाला मदत करणे असा साजरा केला तर तोच माझा खऱ्या अर्थाने वाढदिवस साजरा होईल..”

Protected Content