Home आरोग्य कोरोना : जिल्ह्यात आज आढळला एक बाधित रूग्ण ; एक झाला...

कोरोना : जिल्ह्यात आज आढळला एक बाधित रूग्ण ; एक झाला बरा

0
32

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात आज एक बाधित रूग्ण आढळला असून एक रुग्ण बरा झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविली आहे.

 

जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात जिल्ह्यात भुसावळ तालुक्यात एक बाधित रूग्ण आढळून आला आहे तर एक रुग्ण बरा झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४२ हजार ७९९ रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २१३ रूग्ण बरे होवून घरी परतले तर २ हजार ५७७ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर ९ रुग्ण उपचार घेत आहेत अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी दिली आहे.


Protected Content

Play sound