Home क्राईम जळगावात एकावर प्राणघातक हल्ला

जळगावात एकावर प्राणघातक हल्ला


MARAMARI
 

जळगाव (प्रतिनिधी) हनुमान जयंतीच्या निमित्ताने आयोजित भंडाऱ्यात चौघांनी एकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना दुपारी चार वाजेच्या सुमारास हुडकोमध्ये घडली. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडालेली आहे.

 

यासंदर्भात अधिक असे की, दुपारी चार वाजेच्या सुमारास रिक्षाचालक हर्षद अशोक काळे (वय 32,रा. शिवाजी नगर) हा आपल्या इतर रिक्षाचालक मित्रांसह हुडकोत आयोजित एका भंडाऱ्यात जेवण करण्यासाठी गेला होता. त्याठिकाणी हर्षद काळे, पिंटू कोळी, जनार्दन कोळी यांच्यासह अन्य दोन जणांनी जेवण करण्याच्या कारणावरून लोखंडी हत्याराने मारहाण केली. या मारहाणीत हर्षद याला पाठीला दुखापत झाली असून त्याला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या संदर्भात पोलिसांत कुठलाही गुन्हा अद्याप दाखल नाहीय.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound