Home क्राईम जळगावात सासऱ्याकडून जावयाला मारहाण

जळगावात सासऱ्याकडून जावयाला मारहाण


images 12
 

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील सुप्रिम कॉलनीत सासर्‍याने जावयाला मारहाण केल्याची घटना आज सकाळी घडली आहे. या संदर्भात सासऱ्या विरोधात जावयाने एमआयडीसी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

 

याबाबत माहिती अशी की, आरिफ तसलीम पटेल (वय 20, सुप्रीम कॉलनी) हा अन्सार कादरी पटेल (रा.सुप्रीम कॉलनी) यांचा जावई आहे. आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास पत्नीने माहेरून काही सामान न आणल्यामुळे जावई आरिफ तसलीम पटेल याने त्याबाबत विचारणा केली. याचा राग आल्याने सासरा अन्सार कादर पटेल याने आपला जावाई आरिफ पटेलला शिवीगाळ करून मारहाण केली. याबाबत एमआयडीसी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound