Home धर्म-समाज “व्ही स्कुल फ्री अॅप” मध्ये शिक्षकांचा गौरव

“व्ही स्कुल फ्री अॅप” मध्ये शिक्षकांचा गौरव

0
103


 

पाचोरा प्रतिनिधी | जिल्हा परिषद जळगाव आणि व्हावेल्स ऑफ द पीपल्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने सुरू करण्यात आलेल्या “व्ही स्कूल फ्री अॅप” या शैक्षणिक ॲप साठी सक्रिय योगदान दिल्याबद्दल शिक्षकांचा गौरव करण्यात आला.

पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी डिजिटल कन्टेट तयार करण्यासाठी सक्रिय योगदान व डिजिटल अभ्यासक्रम तयार केल्याबद्दल तालुक्यातील कडे वडगाव येथील पदवीधर शिक्षक तथा जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक राजेंद्र राठोड यांचेसह राजेंद्र चौधरी, कल्पना पाटील व डी. आर. कोतकर यांना जिल्हाधिकारी अभिजित राऊत व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया यांचे हस्ते गौरव करण्यात आला.


Protected Content

Play sound