मुक्ताईनगर प्रतिनिधी | जळगाव बँकेच्या निवडणुकीत विजय प्राप्त केल्यानंतर रोहिणी खडसे खेवलकर यांचे मुक्ताईनगर येथील निवासस्थानी जल्लोषात स्वागत करण्यात आले
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत महिला राखीव प्रवर्गातून दणदणीत विजय प्राप्त केल्यानंतर रोहिणी खडसे खेवलकर यांचे जळगाव येथून मुक्ताईनगर येथील निवासस्थानी आल्यावर जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी सासूबाई पुष्पा ताई खेवलकर आणि मुलगी सारा ने औक्षण करून तर मुलगा समरजितने गुलाल लावून रोहिणी ताई खडसे यांचे घरी स्वागत केले