जळगाव प्रतिनिधी | जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या काल झालेल्या मतदानानंतर आज सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीस प्रारंभ झाला असून थोड्याच वेळात निकालांचे चित्र स्पष्ट होणार आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणूकीसाठी जिल्ह्यात रविवार दिनांक २१ नोव्हेंबर रोजी १५ केंद्रांवर मतदान घेण्यात आले, यात २ हजार ८५३ मतदारांपैकी २ हजार ६८४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत एकुण ९४.०८ टक्के मतदान शांततेत पार पडले. यात सर्वाधिक मतदान मुक्ताईनगर केंद्रावर १०० टक्के झाले. तर त्या खालोखाल भडगाव केंद्रावर ९९.२२ टक्के मतदान झाले आहे. तर सर्वात कमी मतदान यावल केंद्रावर ८८.५९ टक्के झाले आहे.
मतदान केंद्र निहाय मतदान आकडेवारी पुढील प्रमाणे : जळगाव ४०० पैकी ३६६ (९१.५०) टक्के, भुसावळ १३९ पैकी १३४ (९६.४० ) टक्के, यावल ३३३ पैकी २९५ (८८.५९) टक्के, रावेर ३०० पैकी २८२ (९४.००) टक्के, मुक्ताईनगर ७६ पैकी ७६ (१००) टक्के, बोदवड ६० पैकी ५९ (९८.३३) टक्के, जामनेर २०७ पैकी १८७ (९०.३४) टक्के, पाचोरा १८३ पैकी १७२ (९३.९९) टक्के, चाळीसगाव १८३ पैकी १७६ (९६. १७ ) टक्के, पारोळा १९४ पैकी १८१ (९३.३०) टक्के, अमळनेर १८६ पैकी १७८ (९५.७०) टक्के, चोपडा २१६ पैकी २१४ (९९. ०७) टक्के, धरणगाव १३८ पैकी १३३ (९६.३८) टक्के, एरंडोल ११० पैकी १०४ (९४.५५) टक्के असे एकूण ९४.०४ टक्के मतदान झाले आहे. यात विकास सोसायटी मधून ८२५ जणांनी तर इतर मधून १८५९ मतदरांनी मतदान केले.
दरम्यान, काल निवडणूक पार पडल्यानंतर आज सकाळी आठ वाजेपासून जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात आठ वाजेपासून मतमोजणी सुरू झाली आहे. पहिला निकाल लवकरच येणार असून याकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.