Home Cities यावल यावल येथे ओबीसी समाज जनजागृती जागर अभियान रथयात्रा

यावल येथे ओबीसी समाज जनजागृती जागर अभियान रथयात्रा

0
55


यावल प्रतिनिधी । भारतीय जनता पार्टीचा ओबीसी समाज जनजागृती जागर अभियान रथ यावल शहरात गुरूवारी १८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता दाखल झाला. या जागर रथाचे यावल येथील भारतीय जनता पक्षाचे पदधिकारी व कार्यकर्ते यांनी स्वागत केले.

 

उस्मानाबाद जिल्ह्यातून भारतीय जनता पार्टीच्या वतीने ओबीस जागर अभियान रथयात्रा गुरूवारी १८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता यावल शहरात दाखल झाली. हा जागर रथ संपूर्ण राज्यात फिरणार आहे. मागील काही दिवसांपासून भारतीय जनता पक्ष हे संपूर्ण ओबीसी समाजाच्या विरोधात असल्याचे अपप्रचार काही मंडळींकडून करण्यात येत असून याच पार्श्वभूमीवर पक्षाच्या वतीने समाजात जनजागृती व्हावी याकरीता ओबीसी जागर अभीयान राबविण्यात येत आहे.

 

या अभियानांतर्गत यावल शहरातील बुरुज चौक, जुना भाजी बाजार चौक, बोरावल गेट, महाजन गल्ली, वाणी गल्ली परिसर, म्हसोबा चौक, कोर्ट रोड, भुसावळ टी पॉईंट, बस स्टॅन्ड, पंचायत समिती परिसरात रथयात्रा काढण्यात आली. या प्रसंगी भाजपाचे यावल तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, युवा नगरसेवक डॉ कुंदन फेगडे, भारतीय जनता पक्ष ओबीसी सेल जिल्हा उपाध्यक्ष हेमराज फेगडे, माजी यावल तालुका खरेदी विक्री सहकारी संघाचे नरेंद्र नारखेडे, तालुका उपाध्यक्ष नितिन नेमाडे, शहराध्यक्ष निलेश गडे, युवा मोर्चा शहराध्यक्ष रितेश बारी, शहर सरचिटणीस पऱीष नाईक, शहर उपाध्यक्ष योगेश चौधरी, तेजस पाटील ,भूषण फेगडे ,स्नेहल फिरके, मनोज बारी ,विशाल बारी, उज्वल कानडे, सागर लोहार आदींची उपस्थिती होती.

 


Protected Content

Play sound