पारोळा प्रतिनिधी । शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त बुधवार, दि. १७ नोव्हेंबर रोजी पारोळ्यात शिवसेना आणि युवसेनाच्या वतीनं रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १०१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आमदार चिमणराव पाटील व पारोळा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अमोल पाटील यांच्या संकल्पनेतून बुधवार, दि. १७ नोव्हेंबर रोजी पारोळ्यात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यात एरंडोल विधानसभा मतदारसंघातुन रक्तदान करणाऱ्या १०१ रक्तदात्यांना चिमणराव पाटील व अमोल पाटील यांचे हस्ते प्रमाणपत्र आणि २ लाख रूपयाचा अपघाती विमा देण्यात आला.
याप्रसंगी जनकल्याण रक्त संकलन केंद्र, नाशिकचे डॉ.संजय कुलकर्णी, डॉ. श्वेता वारगट, अरूण कुलकर्णी, मनिषा पाटील, वाल्मिक वाळुंच यांनी रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. तालुकाप्रमुख प्रा.आर.बी.पाटील, शहरप्रमुख अशोक मराठे, बाजार समिती उपसभापती दगडू पाटील, संचालक चतुर पाटील, प्रा.बी.एन. पाटील, डॉ.पी.के.पाटील, सचिव रमेश चौधरी, शेतकी संघाचे चेअरमन अरूण पाटील, व्हा.चेअरमन सखाराम चौधरी, संचालक राजेंद्र पाटील, जिजाबराव पाटील, सुधाकर पाटील, चेतन पाटील, युवासेना तालुकाप्रमुख मिलिंद पाटील, मेहु सरपंच विकास बोरसे, तरडी भैय्या पाटील, उंदीरखेडे सरपंच गणेश पाटील, संजय गांधी निराधार समिती सदस्य दादा पाटील, नगरसेवक मनिष पाटील, शिरिष जोशी, सावरखेडे मा.सरपंच राजू पाटील, मा.शहरप्रमुख बापु मिस्तरी, पी.आर.वाणी, युवासेना उपशहरप्रमुख भुषण भोई, शहरप्रमुख आबा महाजन, उपशहरप्रमुख सावन शिंपी, उपतालुकाप्रमुख समाधान मगर, मा.नगरसेवक भिमराव जावळे, अक्षय निकम, दिनेश पाटील, पंकज मराठे, बापु मराठे, गणेश मोरे, राजु बागडे, अस्लम खाटीक, सिध्दार्थ जावळे, महेश मोरे, विलास वाघ, जयदेव चौधरी, अंकुश मराठे, संदेश माने, भुषण टिपरे, महेंद्र राणावत, शुभम पवार, कुंदन पाटील, सुनिल निकम, सुरज चौधरी, एकनाथ पाटील, नानु मराठे, सागर शिंपी, ईश्वर पाटील, मनोज पाटील, महेश ठाकरे, पांडुरंग माळी, शुभम बोरसे, गणेश वाघ, निखिल पाटील, छोटु चौधरी, अजय पाटील, मयुर बोरसे, सुरज चौधरी, हंसराज देशमुख, जयेश काटे यांची उपस्थिती होती.